घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

नाशिकमध्ये ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

Subscribe

एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार, अवघड विषय प्रत्यक्ष शिकवले जातील

नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या नववी ते बारावीचे वर्ग ४ जानेवारीपासनं सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळांनी आज घेतला.

गेल्या महिन्यात दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता, मात्र कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे स्थानिक पातळीवर नव्या वर्षातच शाळा सुरू करण्यावर एकमत झालं होतं. आज पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ४ जानेवारीपासनं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागणार आहे. अवघड विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवले जातील. इतर विषयांचे वर्ग मात्र ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनेटायजरच्या उपाययोजना शाळेकडनं केल्या जातील. मास्कचा वापर मात्र प्रत्येकासाठी बंधनकारक राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -