घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगौण खनिज वाहतूक आता जीपीएसच्या नजरेत

गौण खनिज वाहतूक आता जीपीएसच्या नजरेत

Subscribe

मुदतीनंतर यंत्रणा कार्यान्वित न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा

नाशिक : जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर जीपीएस सिस्टीम बसवण्याचे आदेश देण्यात आल्यानंतरही जिल्ह्यातील २२३१ वाहनांवर ही यंत्रणाच बसविण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुदतीनंतर जीपीएस यंत्रणा नसलेल्या वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तहसीलदारांमार्फत जिल्ह्यातील खाणपट्टाधारक, क्रशरचालकांना अशा वाहनांवर जीपीएस बसवून ते महाखनिज या संगणकीय प्रणालीशी जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाखनिज नोंदणीकृत ३५४४ वाहनांपैकी अवघ्या १३१३ वाहनांवरच जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. अजून २२३१ वाहनांना या यंत्राची प्रतिक्षा कायम आहे.

जिल्ह्यातील सर्व खाणपट्टाधारक, क्रशरचालक यांना गौणखनिजाची वाहतूक करणारया वाहनांना जीपीएस बसवून संगणकीय प्रणालीशी इंटीग्रेट करण्याबाबत तहसीलदारांमार्फत यापूर्वीच निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप सर्व खाणपट्टाधारक, क्रशरचालक यांनी गौणखनिजाची वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस बसवून संगणकीय प्रणालीशी इंटीग्रेट केले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खदाणधारकांना, खडीक्रशर चालक व गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या वाहन मालक यांना जिल्हा प्रशासनाने आता ही यंत्रणा बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत गौण गौणखनिजाची वाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहनांना जीपीएस बसवून संगणकीय प्रणालीशी इंटीग्रेट
करणे आवश्यक आहे. या कालावधीनंतर महसूल यंत्रणेकडून नियुक्त भरारी पथकाकडून अथवा जिल्हाधिकारी नामनिर्देशित करतील अशा व्यक्तीकडून निरीक्षणाच्या वेळी शिवाय गौण खनिजाची वाहतूक करणारी वाहने आढळून आली, तर हे उत्खनन व वाहतूक अवैध समजून त्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

- Advertisement -

 

राज्यात गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूकीचे सनियंत्रण देखरेख करण्यासाठी ‘महाखनिज’ ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.त्यामुळे ज्या गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांनी जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यांनाच वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. जी वाहने जीपीएसवर नाही आणि ती गौण खनिजची वाहतूक करत असेल तर ती अनधिकृत समजून कारवाई केली जाणार आहे. : रोहिणी चव्हाण, गौण खनिज अधिकारी नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -