नाशिक शहरात १४४ कलम लागू; आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार कारवाई

पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी लागू केले कलम

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी जमावबंदीचा १४४ कलम लागू केला आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंधाबाबत जे आदेश काढले आहेत त्यानुसार पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी हे कलम लागू केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. खासगी कार्यालयात ५० टक्के नागरिकांची उपस्थित असावी. कार्यालयात लसीकरण केलेल्याच नागरिकांना प्रवेश द्यावा. लग्न सभारंभांना मात्र ५० टक्के नागरिकांना उपस्थित राहता येणार आहे, असेही पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.