घरमहाराष्ट्रनाशिकसायबर गुन्हेगार शोधणे अवघड : दीक्षित

सायबर गुन्हेगार शोधणे अवघड : दीक्षित

Subscribe

मुक्तविद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन

नाशिक : सायबर युगात होणारे गुन्हे ओळखणे अवघड आहे. गुन्हेगार समोर असताना त्याला ओळखता येणे शक्य नाही. त्यासाठी सामाजिक जागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सायबर सुरक्षा विशेषज्ञ तन्मय दीक्षित यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वास्तुकला, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमार्फत सोमवारी (दि.28) ‘राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त’ दीक्षित यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यापीठाच्या निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदिप निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी विद्याशाखेच्या संचालक डॉ. सुनंदा मोरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. चेतना कमळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठातील संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारीचे स्वरुप बदलले आहे, मात्र या गुन्ह्यांच्या स्वरुपाबाबत समाजात पुरेशी जागृती झालेली नाही. सायबर गुन्ह्यांबाबत जनसामान्यात सजगता निर्माण होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही दिक्षित यांनी व्यक्त केली. डॉ. जयदीप निकम यांच्या हस्ते पोस्टर व मॉडेल स्पर्धेतील विजेत्यांना पारीतोषिके प्रदान करण्यात आली. डॉ. मोरे यांनी प्रस्ताविक केले. डॉ. कमळस्कर यांनी परीचय करुन दिला. तेजस्वी कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सचिन जंगम यांनी आभार मानले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -