घरमहाराष्ट्रनाशिकस्वतःच पिकवलेला कांदा स्वतःच केला निर्यात; शेतकऱ्याची दिशादर्शक कामगिरी

स्वतःच पिकवलेला कांदा स्वतःच केला निर्यात; शेतकऱ्याची दिशादर्शक कामगिरी

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेले बोराडे हे छोटेखानी गाव गिरणा नदीच्या काठी वसलेले असून या गावचा बराचसा भाग बागायती आहे. या गावातील शेतकरी बळीराम सिंह राजपूत यांनी अकरा एकर शेतात उन्हाळी कांद्याची लागवड केली होती.

या वर्षी कांद्याला अगदी पोषक वातावरण असल्यामुळे तसेच अवकाळी पावसाचाही फटका या पट्ट्यात यंदा न बसल्यामुळे एकरी 200 क्विंटल चांगल्या प्रकारचे उत्पन्न त्यांना मिळाले. तसे पाहायला गेले तर कांदा उत्पादक शेतकरी बहुतांशी कांद्याची साठवणूक हे चाळीतच करतात. चाळीत साठवणूक करताना जवळजवळ 45 ते 55 एमएम सर्वसाधारण आकाराचा कांदा लागतो. आणि जर तुम्हाला कांदा निर्यात करायचा असेल तर त्यासाठी 55 ते 60 एमएम कांद्याचा आकार असावा लागतो. त्यामुळे चाळीत कांदा साठवण करताना राजपूत यांनी 55 एमएम चा कांदा गोणीत पॅक केला, निर्यातीकरता पॅकिंगच्या ज्या नियमांचे पालन करायचे तश्या शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी ते पॅकिंग केले. आणि आपल्या पुतण्याच्या मदतीने दुबईच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनी आपला कांदा निर्यात केला. त्यात त्यांना सरासरी पेक्षा आणि स्थानिक बाजारापेक्षा चांगला दर मिळाला आहे.

- Advertisement -

जर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे हा सगळा भागाचा विचार केला तर येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा इत्यादी नाशिक जिल्ह्यातील तालुके हे प्रमुख कांदा उत्पादक तालुके असल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना यांचा अनुभवाचा फायदा घेता येऊ शकतो व चांगल्या प्रतीचा कांदा थेट निर्यातीच्या माध्यमातून दुबई सारख्या ठिकाणी विकून नक्कीच फायदा मिळवता येऊ शकतो.

राजपूत यांचे हे पाऊल नक्कीच इतर शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार असून यापुढे इतरही शेतकरी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शेतीला व्यावसायिक दृष्टिकोनातून बघू लागले तर नक्कीच शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -