घरमहाराष्ट्रनाशिकस्वा. सावरकर स्मारकाची भयाण अवस्था; जयंती-पुण्यतिथीलाच होते आठवण, अन्यथा साफ दुर्लक्ष

स्वा. सावरकर स्मारकाची भयाण अवस्था; जयंती-पुण्यतिथीलाच होते आठवण, अन्यथा साफ दुर्लक्ष

Subscribe

स्वप्निल येवले । नाशिक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार-जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्यात देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ नाशिकमध्ये निर्माण करण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये केली. यापूर्वी भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेने मात्र स्वामी नारायण नगर परिसरातील सावरकर स्मारकाकडे पूरते दुर्लक्ष केल्याचे या स्मारकाच्या दुरावस्थेवरून दिसून येते.

- Advertisement -

येत्या रविवारी (दि.२८) रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आहे. जयंतीनिमित्ताने स्मारकाची स्वच्छता केली जाईलही परंतु वर्षभर या स्मारकाकडे कोणी फिरकत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. स्वामी नारायण नगर परिसरात २ जानेवारी २०१२ रोजी तत्कालीन पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सावरकरांचे स्मारकाचे उद्धघाटन करण्यात झाले होते. तब्ब्ल दशकपूर्ती नंतर देखील सावरकर स्मारकाचा वनवास संपताना दिसत नाही. या सावरकर स्मारकाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. या स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून बर्‍याच ठिकाणी झाडांच्या फांद्या छाटून त्या तिथेच टाकून दिल्याचे नजरेस पडते. सावरकरांच्या पुतळ्याच्या वरती मधोमध छप्परचे पत्रे उडून गेले तर दुसरीकडे कारंजाच्यामध्ये मृतावस्थेत पडलेले कबुतर दिसत असल्याने स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

जर देखभाल दुरुस्ती होऊ शकत नसेल तर मग ठेकेदाराला बिल कशाच्या आधारावर अदा केले जाते, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत भव्य असा बंदिस्त हॉल उभारत स्मारकात रंगीबेरंगी कारंजा बांधून कारंजाच्या मधोमध भव्य असा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. परंतु हा कारंजा एका ठिकाणी गळत असल्याने त्या कारंजात पाणी भरले असता ते त्या कारंजात साठून राहत नाही. त्यामुळे आजपर्यंत हा कारंजा बंद अवस्थेत आहे. भाजपच्यावतीने ४ एप्रिलला याच स्मारकापासून ते पंचवटी कारंजा पर्यंत रासावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. एकिकडे गौरव यात्रेच्या माध्यमातून सावरकरांचे विचारकार्य जनतेपर्यंत पोहचवत असतांना स्मारकाच्या दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष जाऊ नये हे विशेष.

गेल्या वर्षभरापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असताना या स्मारकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. स्मारक उभारल्या पासून मंडळाच्या माध्यमातून याठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम घेतो त्यामुळे त्यावेळी स्वच्छता होते. : सोमनाथ बोडके, अध्यक्ष, युवक मित्र मंडळ

- Advertisement -

पार्किंगसाठी जागाच नाही

सावरकर स्मारक मध्यवर्ती ठिकाणी उभारले गेले आहे. परंतु आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असल्याने तिथे वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने येणार्‍या पर्यटकांची गैरसोय होते.

कारंजा पहिल्या दिवसापासून बंद

सावरकर स्मारकात उभारण्यात आलेला कारंजा पहिल्या दिवसापासून बंद स्थितीत आहे. त्यात कारंजा एका ठिकाणी गळत असल्याने त्याची दुरुस्ती सुद्धा महापालिकेच्या वतीने करण्यात आली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -