घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये शिवसेना इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात

नाशिकमध्ये शिवसेना इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात

Subscribe

माजी आमदार निर्मला गावीत यांच्या कृतीमुळे सेनेतील इतर मंडळी नाराज

राज्यात सगळीकडे विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जनतेशी संपर्क साधण्यासाठी यात्रा सुरू असताना नाशिक मध्ये आज शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात केली आहे. शासकीय विश्रामगृह येथे सकाळी अकरा वाजेपासून उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत तसेच नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान नुकतेच कॉंग्रेसला जय महाराष्ट्र करत हाती शिवबंधन बांधलेल्या माजी आमदार निर्मला गावीत ह्या थेट संपर्कप्रमुखांसोबत विराजमान झाल्याने शिवसेनेतील काशीनाथ मेंगाळ, कावजी ठाकरे यांसारख्या नेत्यांनी दुसर्‍या खोलीमध्ये बसत अप्रत्यक्षरीत्या आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

सर्वप्रथम नांदगाव तालुक्यापासून सुरुवात करत मालेगाव, चांदवड, देवळा यांसह सर्वच तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केलेली आहे. इछुकांमध्ये शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे तसेच नुकतेच कॉंग्रेस मधून बाहेर पडत हाती शिवबंधन बांधलेले रामदास चारोस्कर यांच्यासोबतच शिवाजी चुंभळे, भास्कर गवीत, जयदत्त होळकर, संभाजी पवार, रूपचंद भागवत यांसह इतर शिवसेना नेते उपस्थित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -