घरमहाराष्ट्रनाशिकनिफाडमध्ये भाजपचे इनकमिंग सुरु; सेना, राष्ट्रवादीचे नेते भाजपात

निफाडमध्ये भाजपचे इनकमिंग सुरु; सेना, राष्ट्रवादीचे नेते भाजपात

Subscribe

गुरूदेव कांदे, अश्विनी मोगल यांचा भाजपमध्ये प्रवेश

निफाड पंचायत समिती उपसभापती तथा पिंपळगाव बाजार समिती माजी उपसभापती, संचालक गुरूदेव कांदे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष अश्विनी मोगल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तालुक्यात सध्या सर्वच पक्षांना इनकमिंग व आऊटगोईंगने ग्रासले आहे. मुंबई येथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, समता परिषद, सरंपचांनी भाजप जेष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमूख उपस्थितीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप, तालुकाध्यक्ष संजय वाबळे, कैलास सोनवणे, शंकरराव वाघ, लक्ष्मण निकम, विलास मत्सागर, सरचिटणीस महेश गिरी आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

गुरूदेव कांदे यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला झुलवत अनपेक्षित भाजपमध्ये प्रवेश केला. अश्विनी मोगल यांनी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. परंतु, ऐनवेळी यु-टर्न मारत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार दिलीप बनकर यांचे कट्टर समर्थक नामदेव शिंदे यांनी धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. पंचकेश्वरचे सरंपच गणपतराव ढोमसे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत, मनसे सरचिटणीस अशिष फिरोदिया, समता परिषद जिल्हाध्यक्ष शरद विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा सूरेखा कुशारे, मीना बिडकर, राष्ट्रवादी युवकचे हरिष झाल्टेसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -