घरमहाराष्ट्रनाशिकज्येष्ठ तबलावादक पं. विजय हिंगणे यांचे निधन

ज्येष्ठ तबलावादक पं. विजय हिंगणे यांचे निधन

Subscribe

नाशिक येथील ज्येष्ठ तबलावादक पंडित विजय हिंगणे (८५)यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.

तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक मध्ये साठ आणि सत्तरच्या दशकात संगीत प्रसाराचे त्यांनी मोठे कार्य केले आणि एक सांस्कृतिक शहर अशी नाशिकची ओळख निर्माण करण्यास करण्यास् मोठा हातभार लावला .आपली एल.आय.सी.मधील नोकरी सांभाळून त्यांनी प्रसिद्ध तबलावादक पंडित वसंतराव पांडे, पंडित वसंतराव आचरेकर पंढरीनाथ नागेशकर पंडित ओमकार गुलवडी ,पंडित नाना मुळे यासारख्या दिग्गज गुरूंकडून तबला वादनाचे शिक्षण घेतले आणि नाशिक मध्ये तबल्याचा प्रसार केला. प्रामुख्याने पंडित विजय हिंगणे, पंडित कमलाकर वारे आणि पंडित भानुदास पवार या सर्वांचे या कार्यास मोठे योगदान होते संगीत क्षेत्रातील हे त्रिमूर्ती भाविक या नावाने रसिकांमध्ये परिचित होते. पंडित विजय हिंगणे यांनी पंडित गजाननबुवा जोशी, पंडित यशवंत बुवा जोशी, पंडित मधुकर बुवा पंडित कुमार गंधर्व ,सुमनताई माटे यांच्यासारख्या अनेक दिग्गज कलावंतां बरोबर साथ संगत केली. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या ख्याल गायन आणि नाट्यसंगीत स्पर्धांना त्यांनी अनेक वर्ष साथ संगत केली आणि स्पर्धा संयोजनात महत्त्वाची भूमिका पार पडली .त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये प्रसिद्ध तबलावादक पंडित गिरीश पांडे, पंडित जयंत नाईक यांचा समावेश आहे पंडित हिंगणे यांच्यामागे तबलावादक सुपुत्र मिलिंद आणि धीरज हिंगणे तसेच एक विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -