Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र एमपीएससी परिक्षेला साडेसात हजार विद्यार्थ्यांची दांडी

एमपीएससी परिक्षेला साडेसात हजार विद्यार्थ्यांची दांडी

कोरोना निर्बंधांचे पालन करत १४ हजार विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा

Related Story

- Advertisement -

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने शनिवारी झालेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या परिक्षेसाठी साडेसात हजार विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.
जिल्ह्यातील 58 परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत ही परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते तर, 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी 1 हजार 900 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभुमीवर घेण्यात आलेल्या परिक्षेसाठी परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. तसेच वर्गखोलीत सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत परिक्षा घेण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले.

- Advertisement -