घरमहाराष्ट्रनाशिकसांडपाण्यामुळे लष्करी हद्दीतील आरोग्य धोक्यात

सांडपाण्यामुळे लष्करी हद्दीतील आरोग्य धोक्यात

Subscribe

लोणकर मळा भागात दुर्गंधीचा त्रास व डासांचा उच्छाद, प्रशासनावर नागरिक संतप्त

नाशिक : येथील जयभवानी रोड भागातील लोणकर मळयातील वसाहतीत मिलिटरी हद्दीतून आलेल्या प्रदूषित पाण्याने नागरीक त्रस्त झाले असून महापालिका प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे येथील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
लष्कर हद्दीला लागुन असलेल्या लोणकर मळा भागातील नालीतुन वाहणार्‍या सांडपाण्यामुळे नागरीक हैराण असून गेल्या कित्येक दिवसांपासून या भागातील अनेक घरांमध्ये दुर्गंधी पसरली आहे.

यामुळे नागरिकांना श्वसनाचे रोग होण्याचा संभव आहे, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच ठिकाणी मिलिटरी विभागाचा सेफ्टी टँक असल्याने मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते आहेे. याचा त्वरेने बंदोबस्त करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुनही लक्ष दिले जात नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहे. दरम्यान योगिता गायकवाड यांनी मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी व मिलिटरी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

लष्करी हद्दीतील सांडपाण्याच्या तक्रारी आहेत, मी एमईएसच्या अधिकार्‍यांंना तातडीने पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत, उचित कार्यवाही होईल. – संजय कपूर, कर्नल, आर्टिलरी सेंटर

पंधरा दिवसांपासून मिलिटरी हद्दीतून सांडपाणी वाहत आहे, यामुळे घरांमध्ये दुर्गंधी व मच्छर झाले आहे, याभागातील बहुतेक मुलांना थंडी ताप येत आहे. – मीना राजोळे, गृहिणी

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -