अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण; आरोपीस १० वर्षांचा तुरुंगवास

25 year man held for raping minor girl in aurangabad

आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करणार्‍या आरोपीस गुरुवारी (दि.५) अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी तक्रारदार, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन १० वर्षांची सश्रम कारावास, सहा रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्यांची शिक्षा सुनावली. ही घटना ६ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ७.३० वाजता श्रीकृष्ण नगर येथील शितल अपार्टमेंटच्या टेरेसवर, सातपूर येथे घडली होती.

अकिल गुलाब मनियार (वय ३८, रा. आंबेडकर भाजीमार्केटजवळ, सातपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अकिल मनियार याने आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याला अत्याचाराची घटना कोणास सांगितली तर तुला मारेल, अशी धमकी त्याने दिली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. सी. अवतारे यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्याकडे सुरु झाली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून दिपशीखा भिडे यांनी कामकाज पाहिले.