घरताज्या घडामोडीकोरोनामुळे शंकरराव बर्वे यांचे निधन

कोरोनामुळे शंकरराव बर्वे यांचे निधन

Subscribe

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचे अर्थ सचिव तथा गाडगे महाराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बर्वे (वय-58) यांचे कोरोना आजारामुळे शुक्रवारी (दि.17) सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गुरुवारी (दि.16) दुपारी त्यांना ताप आला. त्यातच त्यांची शुगरही वाढली. कोरोनाचे लक्षणे दिसत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा त्यांच्या कुटुंबियांनी प्रयत्न केला. मात्र, बेड न मिळाल्यामुळे त्यांना मविप्र संचलित डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे.

अखेरपर्यंत सामाजिक कार्यात सक्रीय
महापालिकेतील सातपूर विभागात कार्यरत असलेले शंकरराव बर्वे हे सार्वजनिक जीवनात सातत्याने विविध उपक्रम राबवायचे. वसंत व्याख्यानमाला, सुभाष वाचनालय, खादी ग्रामोद्योग आदींसह विविध प्रकारच्या 50 ते 60 संस्थांवर ते कार्यरत होते. महापालिका कर्मचारी पतसंस्थेचे ते 30 वर्ष अध्यक्ष होते. राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी मोठे सामाजिक कार्य उभे केले होते. त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पंचधातूच्या गणपती मूर्तीचे गणेशोत्सवात विशेष आकर्षण असते. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीचे ते सदस्यही होते. संत गाडगे महाराज नागरी पतसंस्था आणि कर्मवारी काकासाहेब सोलापूरकर सेवाभावी संस्था यांच्या वतिने दिला जाणार राज्यस्तरीय नाशिक भूषण पुरस्काराची संकल्पनाही शंकरराव बर्वे यांचीच होती. पहिले नगराध्यक्ष कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर, तात्यासाहेब शिरवाडकर, निळू फुले, यांचे सानिध्य त्यांना लाभले होते.

- Advertisement -


अनेक सोनेरी क्षणांचे साक्षीदार
बर्वे यांच्या संपर्कात आलेल्या मोठ्या व्यक्तींबरोबरचे जुने फोटो ते फेसबुकवर ‘सोनेरी क्षणांचे साक्षीदार’ या मथळ्याखाली पोस्ट करत. 1980साली मराठी चित्रपट सृष्टीतील थोर अभिनेते निळु फुले यांनी युवक संघटनेच्या कार्यालयास संदिच्छा भेट दिली होती.याप्रसंगाचा फोटो त्यांनी दोन दिवसांपूर्वीच पोस्ट केला होता. हा त्यांचा सोशल मीडियावरील अखेरचा फोटो ठरला.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -