शरद पवार आज ऑनलाईन भेटीला

'लेखक तुमच्या भेटीला' उपक्रमाला आजपासून सुरुवात, नाशिकमधील ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभागाचा उपक्रम

sharad pawar reaction on ministry of Co-operation law

नाशिकमधील ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासचा सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. कार्यक्रमाचे हे २२ वे वर्ष आहे. बुधवार, ६ ऑक्टोबर रोजी लोक माझे सांगती राजकीय आत्मचरित्र या विषयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे व्याख्यान होणार आहे.

या मान्यवरांची होतील व्याख्यानं

  • गुरुवार, ८ ऑक्टोबर – शास्त्र, अर्थपूर्ण जीवनाचे विषयावर अर्थशास्त्रज्ञ व लेखक डॉ. आशुतोष रारावीकर
  • रविवार, १० ऑक्टोबर – आमच्या मनोरंजनाचे बदललेले विश्व विषयावर अभिनेत्री अनिता दाते व अभिनेता चिन्मय केळकर
  • मंगळवार, १२ ऑक्टोबर – ‘दीपोत्सवा’ची लाखाची गोष्ट’ विषयावर फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांची वंदना अत्रे घेणार मुलाखत
  • गुरुवार, १४ ऑक्टोबर – नात्यांचे सर्व्हिसिंग विषयावर विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांचे व्याख्यान
  • मंगळवार, २६ ऑक्टोबर – जगाच्या अद्भूत इतिहासाचा वेध विषयावर इतिहास अभ्यासक सुनीत पोतनीस यांची प्रा. अनंत येवलेकर घेणार मुलाखत
  • गुरुवार, दि. २८ ऑक्टोबर – हिंदी चित्रपट संगीताचा मनोरंजक आढावा विषयावर चित्रपट अभ्यासक व लेखक डॉ. कैलास कमोद यांचे व्याख्यान
  • शनिवार, ३० ऑक्टोबर – इलेक्ट्रिक वाहने काळाची गरज विषयावर शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचे व्याख्यान
  • रविवार, ३१ ऑक्टोबर – माझे वाचन विषयावर पालकमंत्री छगन भुजबळ यांचे व्याख्यान