घरमहाराष्ट्रनाशिकशरद पवार ती मिटींग सिक्रेट

शरद पवार ती मिटींग सिक्रेट

Subscribe

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवर भुजबळांचे वक्तव्य

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल साडेतीन तास चर्चा केली. ही अत्यंत सिक्रेट मिटींग होती. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हा प्रश्न सर्वांना पडला. याबाबत राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार, प्रशांत किशोर यांच्यात भेटीत काही हवामान विषयावर तर चर्चा निश्चितपणे चर्चा झाली नसेल. परंतु काय चर्चा झाली याची मला माहीती नसल्याचे सांगत त्यांनी या भेटीविषयी गूढ अधिकच वाढवले.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले, दोन नेते भेटत असतील तर ते नक्कीच हवामान विषयावर चर्चा करण्यासाठी भेटले नसतील. मी दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असल्यामुळे मला या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर काढलेल्या पत्रकाची माहिती नसल्याचे ते म्हणाले. ते पत्रं मी काही वाचलेले नाही. मराठा समाज समजदार आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजू लागल्या आहेत, असे ते म्हणाले. खासदार संभाजी छत्रपती हे समतोल विचार करणारे आहेत. ते नक्कीच विचार करून निर्णय घेतील, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

मंत्र्यांचे आजोबा-पणजोबांपासून सगळे वारी करतात

- Advertisement -
Chhagan Bhujbal
छगन भुजबळ

मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या आजोबा-पणजोबांपासून अनेकजण वारी करतात. पण कोरोना वाढू नये म्हणूनच सरकारने काही निर्णय घेतला आहे. लग्नात सुद्धा 50 लोकांना आपण परवानगी दिली आहे. विचार करूनच निर्णय घेतला आहे. तो प्रतिष्ठेचा विषय करू नये. ज्यांना राजकारण करायचे आहे. त्यांना रोखू शकत नाही, असे सांगतानाच वारीबाबत कुणी तरी निर्णय जाहीर करायचा होता. तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे, असे भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -