घरमहाराष्ट्रनाशिकशिकलकर टोळी अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

शिकलकर टोळी अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

सराईत गुन्हेगारांकडून दागिने जप्त

नाशिक :  शहरात घरफोडी व वाहनांची चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या शिकलकर टोळीच्या पंचवटी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गुन्हेगारांकडून पंचवटी, गंगापूर, नाशिक रोड व आडगाव भागातील सात घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांकडून सहा तोळे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, पुण्यात घरफोडीचे 27 गुन्हे दाखल असलेला एक सराईत गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.

रामसिंग धनसिंग भोंड (रा. सहकार नगर, भिमवाडी, गंजमाळ, भद्रकाली, नाशिक), फरार गोरखसिंग गागासिंग टाक (रा. हडपसर, पुणे), दोन अल्पवयीन संशयित तसेच चरणसिंग उत्तमसिंग शिकलकर (रा. नाशिक) अशी संशयित गुन्हेगारांची नावे आहेत.

- Advertisement -

पंचवटी पोलिसांनी घरफोडीच्या ठिकाणांचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दुचाकीवर दोघे फिरताना दिसले. त्यानुसार पथकाने सापळा रचत दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच दोघे गंजमाळ परीसरातून पळून गेले. तपास सुरु असताना पोलिसांना तीन दिवसानंतर कारमधील चौघे घरफोडी करीत असल्याची माहिती मिळाली.

६ फेब्रुवारी रोजी पंचवटीतील हनुमानवाडी येथे वाहनातून चौघे व्यक्ती रेकी करत होते. पोलिस आल्याचे कळताच त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पथकाने वाहनाचा पाठलाग केला. त्यावेळी संशयितांचे वाहन महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाजवळील दुभाजकास धडकले. वाहनातील चौघे पळून जावू लागले. पथकाने पाठलाग करुन दोन अल्पवयीन गुन्हेगारांना हत्यारासह पकडले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -