घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे १५ विधानसभा संपर्कप्रमुख

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे १५ विधानसभा संपर्कप्रमुख

Subscribe

जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून घोषणा

नाशिक : जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली आहे. यात तरुण व अनुभवी शिवसैनिकांना संधी देवून त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे एकूण चार आमदार असून, दोन विधानसभा आणि दोन विधानपरिषदेवर प्रतिनिधीत्व करतात. मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांच्यारुपाने कृषीमंत्रीपद पक्षाकडे आहे. पक्षातील आमदारांची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आत्तापासून तयारी करण्यासाठी शिवसेनेने पक्षबांधणी सुरु केली आहे. ज्या मतदारसंघात पक्षाची ताकद कमी आहे, अशा ठिकाणी संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून पक्षाचे बळ वाढवण्याचे आदेश या संपर्कप्रमुखांना दिले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी पक्षाने स्वबळावर विस्तार करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येते. नगरपंचायती असतील किंवा महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांंमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणण्यादृष्टीने या संपर्कप्रमुखांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रत्येक मतदारसंघात नियुक्त केलेल्या संपर्कप्रमुखास तालुक्यातील घडामोडी तातडीने वरिष्ठांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. तसेच जनतेचे काम करताना येणार्‍या अडचणी पक्षातील वरिष्ठांच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न करावे लागतील. महाविकास आघाडी सरकारने जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे प्रमुख आव्हान या संपर्क प्रमुखांसमोर असेल. केवळ पक्षाचे ध्येय, धोरणांपर्यंत मर्यादित न राहता जनतेचा आवाज वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे कामही या संपर्कप्रमुखांना करावे लागेल. तसेच येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडूण आणण्याचे आव्हान असणार आहे.

तालुकानिहाय संपर्कप्रमुख असे :

  • नांदगाव- विजय शिर्के
  • मालेगाव मध्य-विक्रम खंडागळे
  • मालेगाव बाह्य-अरविंद महाडिक
  • बागलाण-प्रशांत सातपुते
  • कळवण-दीपक मोरे
  • चांदवड-सुशिल पुपाला
  • येवला-किशोर चव्हाण
  • सिन्नर-संजय बच्छाव
  • निफाड-गिरीश विचारे
  • दिंडोरी-राकेश कांबळी
  • नाशिक पूर्व-आबासाहेब पतंगे
  • नाशिक मध्य-रवींद्र सुर्वे
  • नाशिक पश्चिम-नीलेश चव्हाण
  • देवळाली-दीपक पाटील
  • इगतपुरी-जयंत साठे
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -