घरताज्या घडामोडीशिवसेना खासदार हेमंत गोडसे कोरोना पॉझिटिव्ह

शिवसेना खासदार हेमंत गोडसे कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खासदार गोडसे हे क्वारंटाइन झाले आहेत. गोडसे यांनी टविटरवरून ही माहीती दिली. माझया संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन गोडसे यांनी केले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चाललाय. कोरोनाविरोधातील लढाईत अनेकजण कोरोनाच्या विळख्यातून जसे अनेक कोरोना योद्धे सुटले नाहीत तसं अनेक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली. दोन दिवसांपूर्वी गोडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी चाचणी केली होती. या अहवालातून गोडसे पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. मी यशावकाश माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन असे गोडसे यांनी म्हटले आहे. यापूर्वी चांदवडचे आमदार डॉ. राहूल आहेर, राष्ट्रवादीच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहीरे, विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे, सिन्नरचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. लोकप्रतिनिधींचा वेगवेगळ्या कामानिमित्त अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे आता राजकीय मंडळींमधील कोरोनाचा धोका अधिक घट्ट होताना दिसत आहे. ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अस्लम शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -