घरमहाराष्ट्रनाशिकपोटनिवडणुकीत भाजपसाठी शिवसेनेची माघारीची तयारी

पोटनिवडणुकीत भाजपसाठी शिवसेनेची माघारीची तयारी

Subscribe

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २३ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या २३ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेबरोबर केलेल्या या युतीचाही या निवडणुकीवर परिणाम होणार असून शिवसेना येथे भाजप विरोधात उमेदवार न देण्याच्या भूमिकेत आहे.

भारतीय जनता पार्टीचे सुदाम नागरे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. लोकसभा निवडणुकीमुळे त्यांच्या रिक्त जागेवरील पोटनिवडणूक लांबणीवर पडली होती. मात्र, लोकसभा निवडणूक संपताच पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. दरम्यान, भाजपचा एक सदस्य कमी झाल्याने तौलानिक संख्याबळानुसार स्थायीत शिवसेनेचे बळ वाढल्याचा दावा करीत एक सदस्य वाढवून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात दावाही केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत युती झाल्याने आणि अपेक्षेपेक्षा मोठे यश लाभल्याने आता यापुढील निवडणुकाही संयुक्तपणे लढण्याचा पक्षीय पातळीवर विचार सुरू आहे. त्यादृष्टीने प्रभाग क्रमांक १० च्या पोटनिवडणुकीत भाजपच्या विरोधात उमेदवार न देण्याचा विचार सेनेत सुरू आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवले आहे.

- Advertisement -

महासभा तहकूब करण्याच्या हालचाली

लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेले धोरणात्मक विषय पोटनिवडणुकीमुळे पुन्हा पुढे ढकलण्यात येणार आहेत. इतकेच नाही तर येत्या ३० मे रोजी होणार्‍या महासभेवरही या निवडणुकीच्या आचारसंहितेचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे ही महासभा देखील तहकूब करण्याच्या हालचाली सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -