घरमहाराष्ट्रनाशिकस्थायी सदस्य नियुक्तीवर सेनेचा आक्षेप

स्थायी सदस्य नियुक्तीवर सेनेचा आक्षेप

Subscribe

सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेवर शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घेतला आक्षेप

स्थायी समितीत सदस्यपदाचा कार्यकाळ दोन वर्षाचा असताना भाजपच्या चार सदस्यांना एका वर्षानंतरच निवृत्त करुन त्या जागी नवीन सदस्य नियुक्तीच्या महासभेच्या प्रक्रियेवर शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आक्षेप घेतला आहे. संबंधित सदस्यांचे राजीनामे प्राप्त झालेले नसतानाही त्यांच्या जागेवर अन्य सदस्यांची नियुक्ती केल्याने ही कृती बेकायदेशीर ठरते असे त्यांनी नगरसचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे नगरसचिवांनीही पत्र देत स्थायीच्या चार सदस्यांनी राजीनामे दिले नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे भाजपच्या खेळीवर कायदेशीररित्या पाणी फेरले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बडगुजर यांनी पत्रात म्हटले आहे की, भाजपचे चार स्थायी समिती सदस्य वर्षा भालेराव, सुप्रिया खोडे, हेमंत शेट्टी व राकेश दोंदे यांचा स्थायी समितीचा कार्यकाळ दोन वर्ष असताना एक वर्षापूर्वीच बेकायदेशिर निवृत्ती देण्यात आली. प्रत्यक्षात महासभा विषयपत्रिकेतील विषय क्र.621 हा निवृत्त होणार्‍या 8 स्थायी समितीच्या सदस्यांच्या जागेवरती नवीन 8 सदस्य नियुक्ती करण्याबाबतचा विषय ठेवण्यात आला होता. परंतु, उपरोक्त चारही सदस्यांची मुदत दोन वर्षांची होती, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरच नवीन सदस्यांची निवड होणे अपेक्षित होते. परंतु, या चारही नगरसेवकांचे राजीनामे महापौर व स्थायी समिती सभापती यांच्याकडून नगरसचिवांना प्राप्त झालेले नाहीत, असेही म्हंटले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले नगरसचिव

महासभेत महापौरांनी स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली आहे. भाजपचे चार सदस्यांचा स्थायी समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा असताना एक वर्ष अगोदरच बेकायदा निवृत्ती दिली आहे. विषयापत्रिकेमधील क्र. ६२१ नुसार निवृत्त होणार्‍या आठ स्थायी समितीच्या सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची नियुक्तीचा विषय ठेवण्यात आला होता. चार सदस्यांची मुदत दोन वर्षांची होती, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे स्थायी समिती सदस्य पदाचे राजीनामे प्राप्त झालेले नाहीत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -