घरक्राइमधक्क्कादायक! पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

धक्क्कादायक! पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

Subscribe

नाशिक शहरात चीड आणि संताप आणणारी घटना घडली आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१५) नवीन नाशिकमधील त्रिमूर्ती चौकात घडली. या घटनेमुळे नवीन नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्रिमूर्ती चौकातील कृष्णा ऊर्फ बाळा अशोक शिंदे (वय २०) यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कृष्णा शिंदे याने पीडितेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत स्वतःच्या घरात चिमुकलीवर बलात्कार केला. ही बाब कुटुंबियांना समजली. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात येत आपबिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा शिंदेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीचक गवांदे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -