घरमहाराष्ट्रनाशिकदुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून मालेगाव येथे फुल विक्रेत्याचा खून

दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून मालेगाव येथे फुल विक्रेत्याचा खून

Subscribe

दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून रविवारी, २७ जानेवारीला सकाळी एका माथेफिरूने फुल विक्रेत्यावर धारदार चाकुने वार करत त्याचा निर्घृण खून केल्याची घटना कॅम्प बंधार्‍यानजीकच्या पुलाजवळ घडली.

दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून रविवारी, २७ जानेवारीला सकाळी एका माथेफिरूने फुल विक्रेत्यावर धारदार चाकुने वार करत त्याचा निर्घृण खून केल्याची घटना कॅम्प बंधार्‍यानजीकच्या पुलाजवळ घडली. वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश काशिनाथ गायकवाड (५५, राहणार जाजुवाडी) असे मृत फुल विक्रेत्याचे नाव आहे. सकाळी १० वाजेच्या सुमारास वडगाव शिवारातील फुल बाजारातून फुले विकत घेवून कॅम्प भागाकडे येत असताना गायकवाड यांच्या स्कुटीचा समाधान दादाजी धिवरे या युवकाला धक्का लागला. या कारणावरुन दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात समाधान याने स्वतःकडील धारदार चाकुने गायकवाड यांच्यावर सपासप वार केले. त्यात गायकवा हे गंभीर जखमी झाले. हिम्मत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या काही नागरीकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

नदीपात्रात चाकू फेकत हल्लेखोर फरार

या घटनेतील संशयित हल्लेखोर समाधान याने हल्ल्यानंतर आपल्याजवळचा चाकू नदीपात्रातील पाण्यात फेकून देत तेथून पळ काढला. वडनेर-खाकुर्डी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक मोताळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पसार झालेल्या समाधानला सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मयत गायकवाड हा नेहमीप्रमाणे फुले घेवून रावळगांव नाक्यावरील आपल्या दुकानाकडे जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. गायकवाड यांच्या मृत्यूने कॅम्पसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -