घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्था अपहार चौघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

ओझर येथील सिद्धिविनायक पतसंस्था अपहार चौघांना सहा दिवसांची पोलीस कोठडी

Subscribe

ओझर : येथील सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत सुमारे ३ कोटी 33 लाख 25 हजार रुपयांच्या अपहार झाल्याने एकच खळबळ या महिन्याभरापूर्वी उडाली होती. या पार्श्वभूमीवर ओझर पोलीस स्टेशनने कारवाई करत मुख्य सूत्रधार दिनेश सौचे, वृंदा दिनेश सौचे, सचिन बाळासाहेब इंगळे, प्रवीण जिभाऊ आहेर, महेश रामदास शेळके, प्रमोद अमृत जाधव यांच्या विरोध तुषार बाजीराव पगार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी बँकेचे लेखापाल दिनेश सौचे, सचिन इंगळे, प्रवीण अहिरे, महेश शेळके यांना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अटक आल्यानंतर ओझर पोलीस ठाण्यामार्फत त्यांना शुक्रवारी (दि. ११) पिंपळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते तर त्यांना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या संस्थेत लेखापाल असलेले मुख्यआरोपी दिनेश सौचे हे जबाबदारीच्या पदावर काम करत असताना त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून इतर चार आरोपींना खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे संस्थेच्या रकमा संस्थेशी कुठलाही संबंध नसताना सचिन बाळासाहेब इंगळे, प्रवीण जिभाऊ अहिरे, महेश रामदास शेळके, प्रमोद अमृत जाधव यांना वर्ग करून संस्थेत अपहार व फसवणूक केली असल्याच्या गुन्ह्या अंतर्गत अटक करण्यात आली.

- Advertisement -
पोलीस तपासात आणखी कोण ?

झालेल्या रक्कम अपहार प्रकरणी पहिल्या टप्प्यात मुख्य आरोपींसह इतरांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असली तरी याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहे याचा सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे बँकेच्या हजारो सभासदांनी व ठेवीदारांनी यातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -