घरमहाराष्ट्रनाशिक‘नामको’त प्रगती पॅनलची एकहाती सत्ता

‘नामको’त प्रगती पॅनलची एकहाती सत्ता

Subscribe

माजी आमदार वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने एकहाती सत्ता पटकाविली

नाशिक : व्यापारी वर्गातील प्रतिष्ठा लाभलेल्या नाशिक मर्चन्टस्‌ सहकारी (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने एकहाती सत्ता पटकाविली. विरोधी सहकार आणि नम्रता या दोन्ही पॅनलचा या निवडणुकीत साफ धुव्वा उडाला.

पावणे दोन लाख मतदार असलेल्या या बॅँकेच्या निवडणुकीत आजवर (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सत्ता होती. त्याच संचालकांनी सोहनलाल भंडारी, वसंत गिते यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली तर प्रतिस्पर्धी सहकारी पॅनलनेदेखील ललित मोदी, अजय ब्रह्मेचा व गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक लढत दिली. तथापि, त्या तुलनेत (कै.) हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र असलेल्या अजित बागमार यांना मात्र करिश्मा साधता आलेला नाही. नवीन नाशिक येथील राजे संभाजी स्टेडियम येथे गुरुवारी (दि. २७) झालेल्या मतमोजणीअंती प्रगती पॅनलचे वर्चस्व सिध्द झाले. निवडणुकीत २१ जागांसाठी ८२ उमेदवार रिंगणात होते. यात  सोहनलाल मोहनलाल भंडारी, महेंद्र मूळचंद बुरड, शिवदास मोहनलाल डागा, प्रकाश मोतीलाल दायमा, संतोष मांगीलाल धाडीवाल, हेमंत हरिभाऊ धात्रक, गणेश बबन गिते, वसंत निवृत्ती गिते, अविनाश मूळचंद गोठी, कांतीलाल भागचंद जैन, हरिष बाबुलाल लोढा, सुभाष चंपालाल नहार, नरेंद्र हिरामण पवार, प्रफुल्ल बुधमल संचेती, विजय राजाराम साने, अशोक श्रावण सोनजे आणि रंजन पुंजाराम ठाकरे, महिला गटात प्रगती पॅनलच्या रजनी जयप्रकाश जातेगावकर आणि शोभा जयप्रकाश छाजेड आणि अनुसूचित जाती जमाती गटातील एकमेव जागेवर प्रगती पॅनलचे उमेदवार प्रशांत अशोक दिवे  यांनी विजय संपादन केला. विरोधी सहकार आणि नम्रता पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -