Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक सिन्नरचा तरुण बनला गुजरातमध्ये जिल्हा विकास अधिकारी

सिन्नरचा तरुण बनला गुजरातमध्ये जिल्हा विकास अधिकारी

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घेतली भरारी

Related Story

- Advertisement -

सिन्नर तालुक्यातील एका लहानशा गावातील रवींद्र ज्ञानेश्वर खताळे हा तरुण आपल्या हुशारीच्या जोरावर थेट गुजरातच्या गीर सोमनाथमध्ये जिल्हा विकास अधिकारी झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घेतलेली ही भरारी तरुणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरावी अशी आहे.

सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर रवींद्र खताळे याने माध्यमिक शिक्षणासाठी मनेगाव येथील मविप्र संस्थेच्या शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर नाशिकमधील केटीएचएम महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासून हुशार असल्याने शाळा आणि कॉलेजमध्येही त्याने सातत्याने पहिला क्रमांक राखला.

- Advertisement -

पारंपरिक व्यवसाय हा शेती असल्याने कौटुंबिक परिस्थिती फार चांगली नव्हती. कुटुंबाचे कष्ट पाहिलेले असल्याने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर रवींद्रने पुण्यातील व्हीआयटी कॉलेजमधून बी. ई. मॅकेनिकलचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील जॉनडिअरमध्ये त्याने काही काळ नोकरी केली. मात्र, त्याचे उच्चाधिकारी होण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर दोन वर्षांनंतर त्याने ही नोकरी सोडली आणि यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. त्याच्या प्रयत्नांना २०१२ मध्ये यश लाभलं.

Ravindra Khataleयोग्य मार्गदर्शन, चिकाटी, अखंड प्रयत्न आणि ध्येय निश्चित असेल तर काहीही अशक्य नाही, हेच मी तरुणाईला यानिमित्ताने सांगेन. आपली स्वप्न नेहमी मोठी ठेवा. ते पूर्ण करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने प्रयत्न करत रहा. अपेक्षित यश मिळवण्यापासून तुम्हाला कुणीही दूर ठेवू शकणार नाही.
– रवींद्र खताळे, जिल्हा विकास अधिकारी, गीर सोमनाथ, गुजरात

- Advertisement -