Homeक्राइममहाराष्ट्राच्या वनसंपदेवर तस्करांची वक्रदृष्टी; ट्रक जप्त, दोघांना अटक

महाराष्ट्राच्या वनसंपदेवर तस्करांची वक्रदृष्टी; ट्रक जप्त, दोघांना अटक

Subscribe

हरसूल भागात कारवाई, खैराचे ८२ नग जप्त, ट्रक सोडूऩ चालक़ ़़़़फरार

पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या हरसूल परिक्षेत्रातील जंगलातून अंधाराचा फायदा घेत खैराच्या तस्करीचा डाव वनविभागाच्या गस्तीपथकाने हाणून पाडला. या कारवाईत पथकाने खैराचे लाकूड असलेली ट्रक ताब्यात घेतानाच या तस्करीत सहभागी दोघांना अटक केली. या घटनेमुळे आदिवासी भागातील जंगलांमधून आजही मोठ्या प्रमाणावर लाकडाची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसूल वनपरीक्षेत्राचे गस्तीपथक रात्रगस्तीवर असताना तस्करीबाबत त्यांना माहिती मिळाली. सहायक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरीक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शोधमोहीम हाती घेतली. याचवेळी आडगाव वनपरीमंडळातील भासवड गावाजवळ एका आडवाटेवर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक संशयास्पद मालवाहू ट्रक वेगाने येताना पथकाला दिसला.

वनपाल अमित साळवे, वनपाल महादू मौळे, वनपाल सुनील टोंगारे यांच्यासह वनरक्षक गजानन कळंबे, मनोहर भोये, ललित आहेर, रामदास गवळी, मंगेश गवळी, वाहनचालक संजय भगरे यांनी स्थानिकांच्या मदतीने दगड आडवे लावून ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, खैराच्या लाकडाने भरलेला आयशर ट्रक दगडांवरून भरधाव निघून गेला. तस्करी करणार्‍या ट्रकचा चालक ट्रक आडमार्गाला उभा करुन फरार झाला. वनगस्तीपथकाने ट्रक ताब्यात घेत कार्यालयात आणला.

माहितगारांच्या मदतीने वृक्षतोड

वन गस्तीपथकाने शासकीय वाहनाने ट्रकचा पाठलाग सुरू केला त्यावेळी या ट्रकला संशयित पिंटू कृष्णा खुताडे व रामू देवू खोकाटे (दोघे रा. धामणी) हे रस्ता दाखवत पळण्यास मदत करत होते. दुसर्‍या रस्त्याने जात या दोघांसह त्यांची दुचाकी (एमएच-१८, एयू-२१८२) ताब्यात घेतली. यानंतर पुन्हा ट्रकचा पाठलाग केला असता काही अंतरावर हा ट्रक रस्त्याकडेला उभा दिसला. ट्रकमधून खैराचे तासलेले ८२ नग जप्त करण्यात आले.