Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ..म्हणून सरसंघचालक डॉ. भागवतांना स्पर्धेत मिळाले जास्त गुण

..म्हणून सरसंघचालक डॉ. भागवतांना स्पर्धेत मिळाले जास्त गुण

Related Story

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे कॉलेजमध्ये असताना प्राचार्यांनी त्यांना अचानक भगवद्गितेवर आधारित एका अध्यात्मिक स्पर्धेत भाग घ्यायला लावला. प्राचार्यांनी स्वत: सांगितल्याने स्पर्धेत सहभागी होण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायही नव्हता. म्हणून डॉ. मोहन भागवत व त्यांच्या एका सहकार्याने स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यांना या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळाले.
भाषणाच्या सुरुवातीलाच डॉ. भागवत म्हणाले, ‘भगवतगीता हा वयोवृध्द काळात वाचण्याचा ग्रंथ नसून तो तरुणांनी आत्मसात करण्याचा ग्रंथ आहे.’ त्यांच्या या वाक्यामुळे या स्पर्धेत डॉ. मोहन भागवत यांना उत्तम प्रकारे गुण मिळाल्याची आठवण त्यांनी आज नाशिकमधील एका कार्यक्रमात सांगितली.
प.पू.स्वामी श्री सवितानंद यांचा अमृत सोहळा गंगापूर रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे गुरुवारी (दि.15) पार पडला. यावेळी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत बोलत होते. तरुण पिढीला त्यांच्या भाषेत अध्यात्मिक जीवन समजावून सांगण्याचे कार्य प. पू. सविदानंद यांनी केले आहे. निस्पृह आयुष्य जगणारे सविदानंद यांचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी जोडणारे असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे मान्य केले. स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांना काय देता येईल, यासाठी जीवन जगणार्‍या व्यक्तिंचे स्वभाव कधी ना कधी जुळतात. त्यामुळे स्वामी संविदानंद यांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऋणानुबंध दृढ होत गेल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कॉलेज जीवनातील अनुभव सांगताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, 1960 मध्ये महाविद्यालयात असताना भगवत गीतेवर आधारित एका स्पर्धेत सहभागी होण्याची सूचना प्राचार्यांनी केली. स्पर्धेची घोषणा यापूर्वीच होऊन गेलेली असल्यामुळे ऐनवेळी जावे लागले. या स्पर्धेचा निकाल काय लागला हा भाग वेगळा परंतु, केवळ भाषणाची सुरुवात भगवतगीता हा फक्त वयोवृध्द व्यक्तींसाठी नसून तरुणांसाठी आहे, अशी सुरुवात केली. त्यामुळे या स्पर्धेत जास्त गुण मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. स्वामी सवितानंद यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वामिंच्या जीवनावार आधारित स्मरणिकेचे प्रकाशन डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -