घरमहाराष्ट्रनाशिकघनकचरा भविष्यात अर्थव्यवस्थेचा भाग बनेल : कोकरे

घनकचरा भविष्यात अर्थव्यवस्थेचा भाग बनेल : कोकरे

Subscribe

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास उत्साहात प्रारंभ

भारतात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करून जमा करावा यासाठी कायदा करून दंडात्मक कारवाई सुरु करावी लागली. घनकचर्‍याची समस्या ही मानवाच्या मानसिक अराजकातून निर्माण झालेली समस्या असून घनकचरा व्यवस्थापन जीवनशैलीचा भाग व्हावा. त्यातून खत निर्मिती व पुनर्वापरातून घनकचरा भविष्यात आर्थिक व्यवस्थेचा भाग बनेल असा विश्वास कर्जत नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा पर्यावरणप्रेमी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे.

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांर्गत आज (दि. २७) वसुंधरा पुरस्कारांचे वितरण समारंभ महानिर्मितीच्या एन.टी.पी.एस. (औष्णिक ऊर्जा प्रकल्प), एकलहरे येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणप्रेमी अनिल गायकवाड यांना वसुंधरा सन्मान तर मिलिंद पगारे आणि पत्रकार भावेश ब्राह्मणकर यांना वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कोकरे पुढे म्हणाले की, निसर्गचक्राचा विचार केला नाही तर सर्वच सजीवांना धोका आहे. डम्पिंग ग्राउंड्सवर कचर्‍याचे ढीग वाढतच आहेत. दुर्गंधी सोबतच त्या ढिगांना आग लागून हवा प्रदूषण होत आहे. घन कचरा धोकादायक आहे. डंपिंग ग्राऊंडमध्ये कचराच ठेवायचा नाही हे धोरण मी जिथे काम केले तेथे स्वीकारले आणि प्रकल्प बांधणी केली. कोणत्याही मायक्रॉनच्या पिशव्यांसह संपूर्ण प्लॅस्टिक बंदी केली. लोकांमध्ये जनजागृती, प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून देणे आणि कायद्याचा वापर या त्रिसूत्रीचा वापर केल्यानेच आज कर्जत नगरपरिषदेला खत निर्मितीसाठी कचरा विकत घेण्याइतपत प्रकल्प विकसित झाला आहे. वसुंधरा क्लबमुळे तरुणांत निसर्गाप्रती भान आले आहे. शासकीय यंत्रणेतची ताकद वापरात आणून कर्मचार्‍यांकडून काम करून घेण्यासाठी त्यांच्या मनाचे परिवर्तन घडवून आणणे महत्वाचे असून ती किमया एनटीपीसीमध्ये निखारे यांनी करून दाखवली असल्याचे मत कोकरे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

एनटीपीसीचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून एनटीपीसीत स्वच्छता आणि हरितकरणाचे काम सुरू आहे. वसाहतीतील एका कॉलनीतील तक्रारीवरून उपाय शोधतांना काही ध्येय निश्चित केले. आधी स्वच्छता केली. नंतर सुंदरतेत भर घातल्याचे ते म्हणाले. यावेळी पुरस्कारार्थींनी मनोत व्यक्त केले. यावेळी किर्लोस्करचे प्रकल्प अधिकारी मकरंद देवधर, वसुंधरा क्लबचे हेमंत बेळे, अमित टिल्लू, स्वप्नील राव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पाटील यांनी केले तर राहुल बोरसे यांनी आभार मानले.

या समारंभानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या द वर्ल्डस् मोस्ट फेमस टायगर (THE WORLD’S MOST FAMOUS TIGER) या नल्लामुत्थू दिग्दर्शित माहितीपटाच्या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. मिडवे आयलँड, ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी यांसारख्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी पसंती दिली. एनटीपीसी वसाहतीतील मुलांनी तयार केलेल्या प्लॅस्टिकपुराणवापर वस्तू प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. तर मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालयात छायाचित्रकार समीर बोंदार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली छायाचित्रण कार्यशाळा पार पडली. यात ५० हुन अधिक हौशी छायाचित्रकार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -