Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र जावई दारु पिऊन बहिणीला त्रास द्यायचा; मेहुण्याने केला खून

जावई दारु पिऊन बहिणीला त्रास द्यायचा; मेहुण्याने केला खून

Related Story

- Advertisement -

जावई दारु पिऊन बहिणीला त्रास देत असल्याने आणि मेहुणे समजून काढत असतानाच भांडण विकोपाला गेल्याने जावयाचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि. 17) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री येथे घडली. पोलिसांनी मेहुण्यास अटक केली आहे. संजय महादु उगले (40) अशी मृताचे नाव आहे. नितीन संपत रोडे (30) असे अटक करण्यात आलेल्या मेहुण्याचे नाव आहे.

नितीन संपत रोडे यांची मावस बहिण प्रतिभा हिचा विवाह गावातीलच संजय महादु उगले यांच्याशी झाला. संजय उगले दारु पिऊन प्रतिभाला शिवीगाळ व मारहाण करायचा. बुधवारीही नवराबायकोत भांडण झाल्यानंतर प्रतिभाने मावसभाऊ नितीन रोडे व निलेश रोडे या दोघांना पती संजयला समजावून सांगण्यासाठी बोलावून घेतले. दोघेही संजयला समजावून सांगत असतानाच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. नितीन रोडेच्या हातातील लाकडी दांडक्याचा प्रहार संजयच्या डोक्यात बसल्याने तो जागीच ठार झाला. याप्रकरणी संजय उगलेचा भाऊ विष्णु उगले याने मुसळगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नितीन आणि निलेश रोडे या दोघा भावांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गरुड, हवालदार सुनील जाधव, विनोद जाधव, राम हरळे करत आहेत.

- Advertisement -