घरमहाराष्ट्रनाशिकपैसे न दिल्याने आईचा खून

पैसे न दिल्याने आईचा खून

Subscribe

येवला शहरातील भरवस्तीत बुंदेलपुरा भागात आईने मौजमजेसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा खून केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला.

येवला शहरातील भरवस्तीत बुंदेलपुरा भागात आईने मौजमजेसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा खून केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. खुनानंतर दोन दिवसांनी घरातून मृतदेहाचा कुजलेला वास आल्यामुळे ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी राजू गुजर याला ताब्यात घेतले आहे.

मृत लीलाबाई कांतीलाल गुजर (वय ७०) या आईने मुलगा राजू उर्फ राजेंद्र गुजर (वय २८) याला मौमजेसाठी पैसे न दिले नाही. यामुळे त्याने कुरापत काढून शिवीगाळ करून जीवानिशी मारले. दोन दिवसांनंतर घरातलून दुर्गंधी आल्यावर ही घटना उघडकीस आली. राजू ऊर्फ राजेंद्र हा वाईट संगतीमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून घरातील कुटुंबियांना त्रास देत होता. तो अनेक अवैध गोष्टींमध्ये सहभागी होता. याबाबत आरोपीचा भाऊ संदीप कांतिलाल गुजर (वय ३५) यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलीस अधीक्षक रागसुधा, पोलीस निरीक्षक नानासाहेब नागरे यांनी तात्काळ भेट दिली. पोलीस निरीक्षक नानासाहेब नागरे, हवालदार अतुल फलके, पीएसआय मोरे, चंद्रकांत निर्मळ, विजय पैठणकर तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -