घरताज्या घडामोडीपंचवटीत दारुड्या मुलाने केली आईची हत्या

पंचवटीत दारुड्या मुलाने केली आईची हत्या

Subscribe

मेरी कॉलनीमधील धक्कादायक घटना; पोलिसांनी घेतले आरोपीस ताब्यात

पंचवटी : ‘दारु पिऊन रात्री उशीरा का आला, तुला आज घरातच घेणारच नाही’ असे म्हणणाऱ्या आपल्या जन्मदात्या विधवा आईला धक्काबुक्की करणाऱ्या मद्यपी मुलाच्या हातून आईचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटी परिसरात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.

याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील मेरी कॉलनी येथे विमल कचरु पवार (वय ६०) आणि प्रशांत कचरु पवार (वय २८, रा. ई टाईप २/१ मेरी कॉलनी, पंचवटी) हे दोघे मायलेक रहात होते. विमल पवार यांचे पती मेरीत नोकरीला होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते. सध्या विमल पवार यांना पतीच्या निधनामुळे पेश्चन मिळत होते आणि याच पेश्ननवर विमल पवार हे आपल्या एकुलता एक मुलगा प्रशांतसोबत जीवन जगत होते. प्रशांत कोणताही कामधंदा करत नसल्यामुळे तो नेहमीच ‘दारु पिण्यासाठी पैसे दे’ म्हणून आईसोबत भांडण करत असे. नेहमीप्रमाणे प्रशांतने आईसोबत भांडण करुन दारु पिण्यासाठी पैसे घेऊन गेला. रात्री उशीरापर्यंत दारु पिऊन फुल्ल नशेत घरी पोहचला. यावेळी त्याने आईला घराचे दार उघडण्यासाठी बाहेरुन आवज दिला. यावेळी त्याच्या आईने आतूनच सांगितले की ‘खूप दारु पिऊन आला आहे, मी तुला घरात घेणार नाही’. यामुळे प्रशांतला आईचा राग अनावर झाला.

- Advertisement -

आई विमल पवार घराबाहेर येताच प्रशांतने आईसोबत हुज्जत घातली आणि आईसोबत झटापट झाली. याचवेळी त्याची आई विमल पवार यांना बिल्डींगच्या बाहेरील लोखंडी गेटजवळील सिमेंटच्या कॉलमवर ढकलले. यात त्यांना गंभीर झाल्यामुळे आणि अतिरक्तस्राव झाल्याने ती मृत झाली. मुलगा दारुच्या नशेत असल्याने झोपून गेला. मात्र, सकाळी उठल्यावर त्याने आईकडे बघितले तर तिची हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच तो घाबरला आणि त्याने तत्काळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -