Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक दारूसाठी मुलाने केला जन्मदात्रीचा खून

दारूसाठी मुलाने केला जन्मदात्रीचा खून

क्रूरकर्माने आईच्या डोक्यात घातली वीट

Related Story

- Advertisement -

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने व्यसनाधीन मुलाने ७८ वर्षीय आई कांताबाई शिवलाल काळे (७८) यांना मारहाण करत डोक्यात वीट मारली. त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता.२३) सकाळी मृत्यू झाला. ही घटना १७ जुलै रोजी राजवाडा, सातपूर येथे घडली. पोलिसांनी मुलगा संशयित कमलाकर काळे (५७) याला अटक केली आहे. सधन कुटुंबाची दारुमुळे वाताहत झाली आहे. कमलाकर हा जिल्हाधिकारी कार्यालयात चालक होता. व्यसनामुळे त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली.

कमलाकर याने गुरुवारी (ता.१८) सकाळी आईकडे दारुसाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिला. त्याने आईचे डोके भिंतीवर आपटत मारहाण केली. राग अनावर झाल्याने त्याने आईच्या डोक्यात वीट मारली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. शेजारच्यांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी (ता.२३) रोजी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सातपूर पोलिसांनी संशयित कमलाकर काळे यास अटक केली आहे.

- Advertisement -