नाशिक जिलयात ६६ टक्के क्षेत्रावर पेरण्या

नाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टी होण्यापूर्वी खरिपाच्या पेरणीसाठी जमिनीतील आवश्यकता ओलीवर पेरण्यांवर भर दिल्याने 66 टक्के पेरण्या झाल्या आहेत. आता सर्व दूर पाऊस झाल्याने उर्वरित पेरण्या लवकरच पूर्ण होतील, असे कृषी विभाग मार्फत सांगण्यात आले आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पहिल्या पावसात काही पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर सुरु असलेल्या पावसामुळे पेरणीला वेग आला आहे. शेतकर्‍यांनी मका पेरणीला अधिक पसंती दिली आहे. या आठवड्यात मक्याची दोन लाख सहा हेक्टर वर म्हणजेच 90 टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षभर सोयाबीनचे दर तेजीत राहिल्याने सोयाबीनचे देखील 40 टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान भाताची लागवड रखडल्याने आतापर्यंत केवळ पाच टक्के क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख 65 हजार हेक्टर आहे. यापैकी मकाचे सर्वाधिक दोन लाख बत्तीस हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. त्यानंतर बाजरी, सोयाबीन, भात यातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र अनुक्रमे 1 लाख 17 हजार 504, 61 हजार 449 व 78 हजार 613 हेक्टर आहे. याशिवाय खरिपात जिल्ह्यात नागली, ज्वारी ही अन्नधान्य पिके, तूर मूग, उडीद ही डाळवर्गीय व भुईमुंग, तीळ, खुरासनी आदी तेलबियांची पेरणी केली जाते. या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 94 हजार 772 हेक्टर असून एकट्या सोयाबीनची 86 हजार 270 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबियांची आतापर्यंतची पेरणी 1 लाख 3 हजार हेक्टर झाली असली तरीही त्यात सोयाबीनचा वाटा अधिक आहे. डाळवर्गीय पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र 84 हजार 690 हेक्टर असले तरी आतापर्यंत केवळ 23 हजार 76 म्हणजे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

89 क्षेत्रावर कपाशी

मालेगाव, बागलाण, नांदगाव, निफाड, सिन्नर व येवला या तालुक्यांमध्ये कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र 40 हजार 322 हेक्टर असून त्यावर आतापर्यंत 31 हजार 117 हेक्टरवर म्हणजे 89.57 टक्के पेरणी झाली आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसापासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेती कामांना देखील वेग आला आहे. शिवाय पेरणीची कामीही सुरु झाली आहेत. मालेगाव 93, बागलाण 79, कळवण 78, देवळा 74, नांदगाव 97, सुरगाणा 10, नाशिक 20, त्र्यंबकेश्वर 02 टक्क्यांवर पेरण्या झाल्या आहेत.