घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रSpecial Report : ‘सिव्हिल’मध्ये सोनोग्राफी मशीनचा 'डेमो' गुरुवारी अन् परवानगी शुक्रवारी

Special Report : ‘सिव्हिल’मध्ये सोनोग्राफी मशीनचा ‘डेमो’ गुरुवारी अन् परवानगी शुक्रवारी

Subscribe

नाशिक : जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (दि.२३) सोनोग्राफी मशीनचा विनापरवानगी डेमो घेतल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला असतानाच गुरुवारी (दि.२४) नाशिक महापालिकेकडून अटी व शर्तींवर परवानगी दिल्याचे समोर आले आहे. असे असतानाही ठेकेदारांकडील सोनोग्राफी मशीन आणि टुडी इको मशीन जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून कशाच्या आधारावर ठेवण्यात आलेत? या मशीनच्या माध्यमातून अनधिकृत गर्भलिंग निदान चाचण्या करण्यात आल्या नाहीत हे कसे सिद्ध करणार असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयानेच कायदेभंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा रुग्णालयासाठी तीन सोनोग्राफी, नऊ टुडी इको मशीन खरेदी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. डॉ. अशोक थोरात यांनी बुधवारी (दि.२२) जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन खरेदीसाठी टेंडरमध्ये सोनोग्राफी मशीन तपासणीसाठी पत्र दिले होते. त्यानुसार ज्यांनी निविदा भरल्या त्या सहा ठेकेदारांना जिल्हा रुग्णालयाने गुरुवारी (दि.२३) निमंत्रित केले होते. या ठेकेदारांकडून सोनोग्राफी आणि टुडी इको मशीनचे प्रात्यक्षिक घेतले गेले. गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार सोनोग्राफी आणि टुडी इको मशीनचा डेमो जरी द्यायचा असेल तरी महापालिकेची लेखी परवानगी आवश्यक असते. ठेकेदाराने सोनोग्राफी मशीन गाडी (एमएच १२-टीव्ही १७३६)मध्ये जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणली. ठेकेदार बुधवार (दि.२२), गुरुवार व शुक्रवार असे तीन दिवस सोनोग्राफी मशीन घेऊन आले.

- Advertisement -

मशीन दुसर्‍या ठिकाणी नेताना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. या तीन दिवसांमध्ये अनधिकृतपणे गर्भलिंग चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय, परवानगी मिळण्याआधीच जिल्हा रुग्णालयानेसुद्धा सोनोग्राफी मशीनचा डेमो कोणाच्या सांगण्यावरुन परस्पर घेतला. त्यामुळे गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. शिवाय, सोनोग्राफी डेमोप्रकरणी परवानगी मिळणेबाबत २० फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. प्रत्यक्षात १९ फेब्रुवारी २०२३ पासून डॉ. थोरात हे बाहेरगावी असताना २० फेब्रुवारी रोजी त्यांनी स्वाक्षरी कशी केली, याबाबत शंका आहे, असे मनसेचे शहर चिटणीस प्रणव मानकर यांनी दिलेल्या पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

वाहने दोन दिवसांपूर्वीच कशी आली?

डॉ. अशोक थोरात यांच्या मते परवानागी शुक्रवारी मिळाल्यामुळे डेमोची प्रक्रिया शुक्रवारी राबवण्यात आली. प्रत्यक्षात असे जर असेल तर जिल्हा रुग्णालयात संगणक मशीन असलेली वाहने दोन दिवसांपूर्वीच कशी आली? या वाहनाने व्हिडीओ फुटेज आपलं महानगरकडे उपलब्ध आहेत. परवानगी मिळालेली नसतानाही संबंधित ठेकेदारांना जिल्हा रुग्णालयात कशासाठी बोलवण्यात आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी व टूडी इको मशीनचा डेमो घेण्याची परवानगी शुक्रवारी (दि.२४) मिळाली. यानुसार डेमो घेण्यात आला आहे. : डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हील

जिल्हा रुग्णालयात विनापरवानगी सोनोग्राफी व टू डी इको मशीनचा डेमो केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल झाला आहे. त्यानुसार चौकशी सुरु करण्यात आली आहे. दोषी आढळून येणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. : दिलीप ठाकूर, पोलीस निरीक्षक, सरकारवाडा

सोनोग्राफी मशीनचा डेमो घेताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व इतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी गर्भलिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले आहे. सोनोग्राफी मशीनचा डेमो गुरुवारी (दि.२३) घेण्यात अला. प्रत्यक्षात महापालिकेने शुक्रवारी (दि.२४) परवानगी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. : प्रणव मानकर, शहर चिटणीस, मनसे, नाशिक शहर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -