Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये ३ खासगी हॉस्पिटल्समध्ये स्पुतनिक लस

नाशिकमध्ये ३ खासगी हॉस्पिटल्समध्ये स्पुतनिक लस

लसींचे दरही झाले निश्चित, नाशिककरांसाठी आता लसींचे तीन पर्याय

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. आता बहुप्रतिक्षित अशा रशियाची स्पुतनिक व्ही लसही नाशिकमध्ये उपलब्ध झाली असून शहरातील तीन खासगी रूग्णालयात नागरिकांना ही लस उपलब्ध होणार आहे. याकरीता दरही निश्चित करण्यात आले आहेत.

नाशिक शहरातील नागरिकांमध्ये स्पुतनिक या लसी संदर्भात आकर्षण वाटू लागले होते. आता त्या प्रतीक्षा संपली आहे. सध्या भारतीय बनावटीच्या दोन लस उपलब्ध आहे. परंतु लसींचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आता लसींचा तुटवडा लक्षात घेता स्पुतनिक लसीचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. शहरातील तीन खासगी रूग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लसीच्या एका डोससाठी ११४५ रूपये शुल्क आकारले जाणार असून २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. सद्यस्थितीत शहरामध्ये नऊ खाजगी हॉस्पिटल मध्ये लसीकरण चालू आहे. ज्या नागरिकांना आर्थिक दुर्ष्ट्या शक्य आहे त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

या रूग्णालयात लसीकरण सुरू

- Advertisement -

अपोलो, अशोका, मानवता, सहयाद्री, एसएमबीटी, सुश्रुत, सुयश, व्होकहार्ट, लाईफ केअर रूग्णालयात नागरिक लसीकरण करून घेऊ शकता.

लस आणि दर असे…

कोविशील्ड लसीसाठी ७८० रूपये तर कोव्हॅक्सिनसाठी १४१० रूपये तर स्पुतनिक व्ही साठी ११४५ रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरातील ९ खासगी रूग्णालयांत लसीकरण सुरू आहे.

- Advertisement -