बारावी निकालाची एसएससी बोर्डाला खात्री!

दहावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडेच पडून असल्याने निकाल उशिराने

SSC Paper Leak science and technology part 2 paper lead and sale in 500 rs kolhapur
SSC Paper Leak : दहावीच्या २ विषयांचा पेपर फुटला?, ५०० रुपयांना प्रश्नपत्रिकांची विक्री

नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी,मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बारावीचा निकाल निर्धारीत वेळेत लागेल, अशी खात्री एसएससी बोर्डाला आहे. मात्र, दहावीच्या उत्तरपत्रिकाच शिक्षकांकडे पडून असल्याने दहावीच्या निकालास उशिर होणार आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे दहावीचा भुगोलाचा पेपरही रद्द करण्यात आला होता. तसेच लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने त्याचा निकालावर देखील परिणाम झाला आहे. बारावीच्या परीक्षा वेळेत संपल्यामुळे निकालाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे बारावीचा निकाल जून महिन्यात जाहीर होईल. मात्र, इयत्ता दहावीच्या उत्तरपत्रिकाच शिक्षकांकडे अडकून पडल्या आहेत. त्यांना घराबाहेर पडणे अशक्य झाल्याने तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या कार्यालयापर्यंत पोहोचवणे अवघड होऊन बसले आहे.
..
विभागात तीन लाख विद्यार्थी
नाशिक विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे 2 लाख 15 हजार 597 विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे एक लाख 66 हजार 81 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडली. तर दहावीची परीक्षा 3 मार्चला सुरू झाली. बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. तसेच दहावीचा निकाल जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लागतो.
&
प्रतिक्रिया
बारावी परीक्षेचा निकालाचे 80 टक्के काम पूर्ण झाल्यामुळे निकाल वेळेत लागेल. परंतु, दहावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडे अडकल्याने त्याला थोडा उशिर होईल. या उत्तरपत्रिका बोर्डाच्या कार्यालयाकडे पोहोचवण्याचे आवाहन शिक्षकांना केले आहे.
-कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष (विभागीय शिक्षण मंडळ)