घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रवणी-सापुतारा रस्त्यावर एसटीने दोन दुचाकींना चिरडले; आठ महिन्यांच्या चिमुरठ्यासह आई, वडिलांचा मृत्यू

वणी-सापुतारा रस्त्यावर एसटीने दोन दुचाकींना चिरडले; आठ महिन्यांच्या चिमुरठ्यासह आई, वडिलांचा मृत्यू

Subscribe

नाशिक : सापुतारा-वणी रस्त्यावर गुरुवारी (दि.९) दुपारी २ वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. सुरगाणा-नाशिक एसटी बसने खोरीफाटा येथे दोन दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्यांच्या चिमुरठ्यासह त्याच्या आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

सुरगाणा-नाशिक एसटी बस वणी-सापुतारा रस्त्यावरुन भरधाव वेगाने जात होते. बस खोरीफाटा परिसरात एसटीचालकास भरधाव गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही. बसने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यात दुचाकींचा चक्काचूर झाला असून एका दुचाकीवरील आठ महिन्यांच्या चिमुरठ्यासह त्याच्या आई-वडिलांचा जागीचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

- Advertisement -

दुसर्‍या दुचाकीवरील खोरीफाटा परीसरात एक दुचाकी रस्त्यालगत उभी होती व त्यावरील लोक झाडाखाली बसलेले असताना या दुचाकीला,धडक देत समोरुन येणार्या दुसर्या दुचाकीला धडकत सुमारे तीस ते पस्तीस मिटर अंतरापर्यत या दुचाकीला फरफटत नेले व या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन लोकांना प्राणास मुकावे लागले एस टी बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहीती मिळाली असुन अपघातानंतर वाहतुककाही काळ खोळंबली होती पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुस लावल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली

दुचाकीवरील मयत हे सारोळा खुर्द तालुका निफाड येथील असल्याची माहीती मिळाली आहे. मागील आठवड्यात चौसळे फाट्यावर कारचा अपघात होऊन तीन लोकांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असताना एस टी चालकाच्या अनिंयत्रीत वेगामुळे व दुर्लक्षामुळे एकाच कुटुंबातील तिघे मृत्युमुखी पडले आहेत. अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजुस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सपोनी स्वप्नील राजपुत पोऊनी प्रविण उदे व सहकारी यांनी वाहतुक पुर्ववत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -