घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये एसटी कर्मचार्‍यांचा संप आणि प्रवाशांचे हाल कायम

नाशिकमध्ये एसटी कर्मचार्‍यांचा संप आणि प्रवाशांचे हाल कायम

Subscribe

राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटल्याची घोषणा केल्यानंतरही तोडगा नाहीच

राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटल्याची घोषणा केल्यानंतरही कर्मचार्‍यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२२) शहरातील बसस्थानकांवर शुकशुकाट बघायला मिळाला.

राज्य परिवहन महामंडळाची ‘लालपरी’ दोन महिन्यांपासून रुसली आहे. राज्य शासनात विलिणीकरणाच्या मुद्दावर कर्मचार्‍यांनी सुरु केलेला संप अजूनही मिटलेला नाही. कर्मचारी डेपोसमोर बसलेले आहेत. त्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली तरी कर्मचारी अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे ‘लालपरी’ अजूनही रस्त्यावर धावताना दिसत नाही. शहरातील जुने सीबीएस, नवीन सीबीएस, मुंबई नाका बस स्थानकांमध्ये फक्त खासगी शिवशाही बसेस प्रवाशी वाहतूक करत आहेत. बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांना याच बसेसचा ‘सहारा’ मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येते.

- Advertisement -

दरम्यान, बुधवार (दि. २२) पासून कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांवरील कारवाई तत्काळ मागे घेण्यात येणार आहे. तसेच फौजदारी स्वरुपाच्या कारवाई संदर्भात न्यायालयीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, त्यांनाही कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु, कर्मचारी संपावर ठाम असल्यामुळे आता त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे विभाग नियंत्रकांच्या माध्यमातून नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच न्यायालय अंतिम निकाल काय देते यावर आंदोलनाचे भवितव्य निश्चित होणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -