घर महाराष्ट्र नाशिक उत्पादन शुल्कच्या कारवाईत दमणच्या मद्यसाठ्यासह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

उत्पादन शुल्कच्या कारवाईत दमणच्या मद्यसाठ्यासह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

Subscribe

पेठ तालुक्यातील करंजाळी तपासणी नाक्यावर उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दमणमध्ये तयार झालेल्या मद्यासह १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्याच आठवड्यात या विभागाने तब्बल ६५ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहने ताब्यात घेतली होती. त्यामुळे कारवाईनंतरदेखील मद्याची अवैध वाहतूक सुरूच असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले.

विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या अखत्यारितील भरारी पथकांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोन वाहनांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी थांबण्याची सूचना केल्यानंतरही पळ काढलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारला पथकाने पाठलाग करून उंबरठाण शिवारात पकडले, तर निंबारपाडा राशागावरोड येथे ट्रकमध्ये मोठा मद्यसाठा आढळून आला. ही दोन्हीही वाहने गुजरात पासिंगची आहेत. ट्रकमध्ये आढळून आलेल्या मद्यसाठ्यात जॉन मार्टिन प्रिमियम विस्की, इम्पेरियल ब्ल्यू विस्की, हायवर्ड्स स्टाँग बिअर असे ४५ बॉक्स होते.

या पथकामुळे मोहीम फत्ते

उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एन. एम. खांदवे, दुय्यम निरीक्षक एस. एस. बनसोडे, जवान लोकेश गायकवाड, संजय सोनवणे, महेश खामकर, महेश सातपूते, सुनीता महाजन यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. याप्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सुरेंद्र बनसोडे करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -