घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात २१०० कोटींच्या ‘निओ मेट्रो’ला शासनाचा हिरवा कंदील

नाशकात २१०० कोटींच्या ‘निओ मेट्रो’ला शासनाचा हिरवा कंदील

Subscribe

राज्य मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय; प्रकल्प राबवणारे नाशिक हे भारतातील पहिलेच शहर

सार्वजनिक वाहतुकीला बळकटी देण्यासाठी मेट्रोच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘निओ मेट्रो’चा महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्यास राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारी (ता. २८) झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यानिमित्ताने निओ मेट्रो’चा प्रकल्प राबविणारे नाशिक हे भारतातील पहिले शहर बनले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च २१०० कोटी ६० लक्ष इतका आहे.
निओ मेट्रो प्रकल्पासाठी गंगापूर ते नाशिकरोड आणि गंगापूर ते सीबीएसमार्गे मुंबईनाका असे दोन मार्ग विकसित केले जाणार आहेत.

अर्थात हे मार्ग जमिनीवरचे नसून हवेतील (पूलस्वरुपात) असतील. प्रकल्पासाठी प्रती किलोमीटर २५० ते ४०० कोटींचा खर्च अंदाजित आहे. शिवाय तिकीटांच्या दरामुळे प्रवासीही मेट्रोपासून दूर राहतात. मेट्रोचे बांधकाम आर्थिकदृष्ठ्या व्यवहार्य नसल्याने शासनाने महामेट्रोच्या माध्यमातून ‘निओ मेट्रो’च्या प्रकल्प नाशिकमध्ये साकारण्याचे नियोजन केले आहे. निओ मेट्रोचा संपूर्ण प्रकल्पातील ६० टक्के निधी हा कर्जाच्या माध्यमातून उभा राहिल. तर ४० टक्के निधी केंद्र आणि राज्य सरकार देईल.

- Advertisement -

नाशिकच्या शिष्टमंडळाने मानले आभार

हा प्रकल्प म्हणजे राज्य शासनाने नाशिकला दिलेली भेट आहे, असे सांगत नाशिकमधील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती उध्दव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजपचे उपाध्यक्ष सुनील बागूल, सुनील आडके, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते.

शासनाने मंजूरी देऊन एका पथदर्शी प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला आहे

महाराष्ट्र शासनाने नाशिक शहराकरिता एक प्रभावी, स्वस्त, आणि पर्यावरणपूरक, योग्य अशी परिवहन प्रणाली देण्याचा निश्चय केला आहे. महामेट्रोने या संदर्भात शक्याशक्यतेचा अभ्यास करुन आपला अहवाल सिडको, नाशिक महापालिका, राज्य शासन यांना सादर करुन याबाबतचा डीपीआर तयार केला. या डीपीआरला शासनाने मंजूरी देऊन एका पथदर्शी प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला आहे.  -ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

‘मेट्रो-निओ’ची ठळक वैशिष्ट्य

  • शहरात ४० टायरबेस जोडबस धावणार
  • एका बसमध्ये किमान १५० प्रवासी बसण्याची व्यवस्था
  • वातानूकूलित विजेवर चालणारे कोच
  • टायर लोखंडी नाही तर रबरी असतील
  • स्वयंचलित दरवाजे, आरामदायी आसन, प्रवाशांसाठी माहिती फलक
  • बसस्थानकांवर सरकते जिने, लीफ्टची व्यवस्था
  • बसेस मुख्य कॉरिडॉरवरून जाताना चार्ज होतील
  • स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेची गरज नाही

एकूण ३२ किलोमीटरचे मार्ग

  • गंगापूर ते नाशिकरोड रेल्वेस्थानक (२२ किलोमीटर)-१९ बसस्थानके
  • गंगापूर ते मुंबईनाका (१० किलोमीटर) – १० बसस्थानके
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -