घरमहाराष्ट्रनाशिककेंद्राच्या योजनांमध्ये राज्यांचा ४० टक्के वाटा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केंद्राच्या योजनांमध्ये राज्यांचा ४० टक्के वाटा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद

नाशिक : केंद्र सरकारच्या योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे. राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेने अगदी तालुका आणि गाव पातळीवर काम करून या योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहचविले आणि लाभार्थींच्या चेहर्‍यावरचे समाधान पाहिले की हीच आपल्या आयुष्याची कमाई वाटते, असे उद्गार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकरी व माजी सैनिकांशी संवाद साधताना काढले.

मंगळवारी  कालिदास कलामंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, योजना केंद्राच्या असोत की राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणांचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुंबईतून पालकमंत्री अस्लम शेख, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच वरिष्ठ अधिकारी तसेच नाशिकच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, निलेश श्रींगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी कवनईचे आनंद पाटील, सटवाई वाडीचे नामदेव मेधाने, बागलाणचे मीरा पवार यांच्याशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यावेळी संवाद साधला.

यांच्याशी साधला संवाद

  • मीराबाई भुरसिंह पवार, पिंपळगाव, ता. बागलाण
  • नामदेव रामभाऊ मेधने, सटवाईवाडी, ता. देवळा
  • आनंदा शंकर पाटील, कावणे ता. इगतपुरी

आठ योजनांमुळे जीवन सुरळीत
केंद्र व राज्य शासनाच्या एकूण 8 योजनांचा लाभ मी घेतला आहे. यामध्ये घरकुल योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर, त्यामध्ये वीज जोडणी, जलजीवन मिशन योजनेतंर्गत नळ जोडणी, उज्वला योजनेतून गॅस, स्वच्छ भारत योजनेच्या माध्यमातून शौचालय अशा ८ योजनांचा लाभ घेतल्याने माझे जीवनमान उंचावले असून जीवन सुरळीत सुरु झाले आहे. तसेच माझ्या घराच्या छतावरुन पडणारे पाणी शौच खड्यात पडेल अशापद्धतीने नियोजन केले आहे. घराच्या परिसरात परस बागही विकसित केली आहे.

– आनंद शंकर पाटील, कावणे, ता.इगतपुरी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -