घरमहाराष्ट्रनाशिकअडचण ठरणार्‍या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या हालचाली?

अडचण ठरणार्‍या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या हालचाली?

Subscribe

साम, दाम, दंड, भेद या नितीचा निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून वापर केला जातो. यंदाही ही निती वापरत नाशिक लोकसभा मतदार संघातील एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

साम, दाम, दंड, भेद या नितीचा निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून वापर केला जातो. यंदाही ही निती वापरत नाशिक लोकसभा मतदार संघातील एका उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या मतांमध्ये वाटेकरी ठरणार्‍या एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद करण्याची मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपसूकच या उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडून या बड्या उमेदवाराला बळ पुरवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकच्या रणसंग्रामात यंदा तुल्यबळ उमेदवार रंणांगणात आपले नशीब आजमावत आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मते मागण्याबरोबरच पडद्यामागील हालचालींनाही चांगलाच जोर आला आहे. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारांकडून प्रचारसभा, प्रचार रॅली, बैठकांचा धडाका सुरू असला तरी, पुढच्या टप्प्यात पडद्यामागील घडामोडींनाही चांगलाच वेग येणार आहे. निवडणुकीत मतदारांपर्यंत जाऊन मत मागणे इथपर्यंतच निवडणुका मर्यादित राहील्या नसून याकरता राजकीय डावपेचही महत्वाचे असतात. नाशिकच्या मैदानात प्रत्येक पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केल्याने राष्ट्रीय नेते आता पुढच्या टप्प्यात नाशिकच्या रणांगणावर प्रचारात उतरणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत बड्या उमेदवारांना मतांच्या ध्रुवीकरणाची मोठी धास्ती आहे. त्यामुळे ऐनवेळी मोठे नुकसान होण्याच्या भीतीने त्यांनी आतापासूनच संबंधितांना मैदानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत हे प्रयत्न सुरू राहणार आहेत. ‘आपलं महानगर’च्या हाती आलेल्या माहितीनुसार एका मातब्बर उमेदवाराकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्जच छाननीत बाद होण्यासाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत. अर्थात याला प्रतिस्पर्ध्यानेही संमती दिल्याचे अंतर्गत सेटींग झाल्याचेही समजते.

- Advertisement -

पक्षाची नाचक्की नको म्हणून अर्ज बाद ठरल्याचे कारण पुढे करत पाठींबा दर्शवण्याची यामागची खेळी असल्याचेही बोलले जात आहे. याकरता दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांची मुंबईत यासंदर्भात चर्चाही झाली असून केवळ मैत्रीपूर्ण संबधांखातर ही सेटींग झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे संबधित उमेदवाराचे ‘बळ’ वाढणार असून काहींचे अर्ज हे कायम राहावेत यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीला अद्याप चार पाच दिवसांचा अवधी असून तत्पूर्वीच ही खेळी खेळून उमेदवार निश्चिंत झाले असल्याचे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -