घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुक्या जनावरांना फास, येवला नगरपरिषदेची अमानुषता

मुक्या जनावरांना फास, येवला नगरपरिषदेची अमानुषता

Subscribe

मोकाट जनावर पकडण्याची मोहीम ठरतेय जीवघेणी, अनेक जनावरांना गंभीर जखमा

काही ठिकाणी कुत्र्याच्या गळ्याला फास, तर कुठे पाय धरून चाललेली फरफट अशा अमानुषपणे येवला नगरपालिकेने मोकाट जनावरांसह भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम हाती घेतली आहे. या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी या जीवघेण्या मोहीमेविरोधात प्रचंड असंतोष व्यक्त केला.

येवला शहरात भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा नागरिकांना प्रचंड त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर येवला नगरपालिकेने ठेकेदाराच्या माध्यमातून भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांना पकडून शहरापासून दूर अंतरावर जंगलात सोडून देण्यासाठी मोहीम हाती घेतली. अलिकडेच झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या बैठकीत या मोहीमेवर शिक्कामोर्तब झालं होतं. त्यासाठी ठेकेदारही निश्चित झाला. मात्र, संबंधित ठेकेदार आणि त्याच्या कार्यपद्धतीकडे डोळेझाक करणाऱ्या नगरपालिकेमुळे कुत्र्यांची अत्यंत अमानुषपणे धरपकड सुरू आहे. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मोहीमेचं वास्तव पुढे आलं. या मोहीमेतील क्रूरतेमुळे अनेक जनावरांना गळ्याला गंभीर जखमा झाल्यात.

- Advertisement -

संदर्भात प्राणीमित्र गौरव क्षत्रिय यांनी येवल्याच्या सीईओंशी संपर्क साधला असता त्यांनी असमाधानकारक उत्तरं दिलं. त्यामुळे प्राणीप्रेमी संतप्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांना शास्त्रीय पद्धतीने पकडावं आणि कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्बिजीकरण हाती घ्यावं, अशी मागणीही आता पुढे येतेय.

व्हायरल व्हिडिओत दिसली अमानुषता

रात्रीच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मोहीमेत ठेकेदाराची काही माणसं कुत्र्याच्या गळ्यात फास टाकून त्याला ओढतात. त्यानंतर याच अवस्थेत गाडीच्या टपावरील काही माणसं दोरीने त्याला वर ओढून गाडीच्या मागच्या बाजूला बंदीस्त ठिकाणी फेकून देतात. जीव वाचवण्यासाठी एक कुत्री प्रचंड विरोध करत असते. मात्र, तिच्या गळ्यातला फास तसाच ठेवून कधी शेपटी तर कधी पाय ओढून तिला गाडीत अक्षरशः फेकलं जातं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -