घरताज्या घडामोडीकोरोना उच्चाटणाच्या संकल्पनांना पुणे विद्यापीठाचे बळ

कोरोना उच्चाटणाच्या संकल्पनांना पुणे विद्यापीठाचे बळ

Subscribe

संशोधकांकडून मागविले प्रस्ताव, उपाययोजना सुचविण्याचे आवाहन

नाशिक : कोरोना विषाणूने थैमान घातलेला असतांना विविध पातळ्यांवर यासंदर्भातील संशोधन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इनोव्हेटर, संशोधकांना आपले संशोधन मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कोव्हिड 19 संदर्भात किंवा सध्या उद्भवलेल्या आपत्तीच्या व्यवस्थापनाशी निगडीत संकल्पना पाठविण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आलेले आहेत. मात्र पुणे विद्यापीठात मर्यादित मनुष्यबळासोबत कामकाज सुरू आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अ‍ॅण्ड लिंकेजेस यांच्यातर्फे इनोव्हेटर, संशोधकांना आपल्या संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे. कोविड 19 संदर्भातील किंवा सध्या निर्माण झालेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे, यासंदर्भात उपाय सुचविता येणार आहेत. या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक ती मदत, पाठबळ विद्यापीठातर्फे उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रस्ताव ईमेलद्वारे किंवा 9850509454/9823011747 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवावे, असेही विद्यापीठाने जारी केलेल्या सूचनेत नमुद केले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -