घरमहाराष्ट्रनाशिकविद्यार्थी-नागरिकांची जीव धोक्यात घालून कसरत

विद्यार्थी-नागरिकांची जीव धोक्यात घालून कसरत

Subscribe

आंबूपाड्यात संततधारमुळे पूरस्थिती

तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग असलेल्या आंबोडा-बेडसा परिसरातील आंबूपाडा येथे शासकीय आश्रमशाळा व आयटीआय आहे. तसेच मुख्य बाजारपेठ म्हणून बार्हे येथे या भागातील नागरिक येतात. शासकीय आश्रमशाळा ते झगडपाडामध्ये एक अरुंद आणि कमी उंचीचा पूल आहे.

पावसाळ्यात कमी जरी पाऊस पडला तरी येथे पुर येत असतो आणि त्या पुलावरून वेगाने पाणी वाहत असते. त्यामुळे या परिसरातील झगडपाडा, खोकरविहिर, चिंचपाडा, भेनशेत, कहांडोळपाडा या गावातील विद्यार्थ्यांना, नागरिकांना तसेच शिक्षकांना या पुलावरून येताना जाताना जीव धोक्यात घालून मोठी कसरत करावी लागते आहे. तर जास्त पाऊस पडल्यास विद्यार्थी, शिक्षकांना जात येत नाही. तसेच चिंचपाडा (खोकरविहिर) येथील नवीन बांधलेले रुग्णालय डॉक्टर व कर्मचारीविना धुळ खात असल्याने याच पुलावरून मोठी कसरत करीत जीव धोक्यात घालुन बार्हे येथील रुग्णालयात रुग्णांना न्यावे लागत आहे. येथे जास्त उंचीचा पूल बांधावा, रुग्णालयात डॉक्टर व कर्मचार्‍यांची नियुक्ती करून रुग्णालय लवकर सुरू करावे, अशी मागणी मनोहर जाधव, सुनील महाले, हिरामण महाले, हंसराज घांगळे, हिरामण चौधरी, जयराम घांगळे, मनोहर महाले, देवीदास घांगळे आदी ग्रामस्थ तर विद्यार्थी पुष्पराज घांगळे, मनीषा महाले, दीक्षा जाधव करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -