घरक्राइमबोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

बोटिंग करताना विद्यार्थी बुडाला

Subscribe

नाशिक : सायखेडा महाविद्यालयाचा बोटिंग क्लबचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.7) सकाळी 8 वाजता सायखेडा शिवारात घडली. अचानक बोटीचा तोल गेल्याची ही घटना घडली. रवींद्र बाळकृष्ण भोईर (वय 20, ता. चाटोरी, ता. निफाड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

गोदावरी नदीपात्रातील सराव करणारे विद्यार्थी व प्रशिक्षक यांनी त्याला वाचविण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतली. परंतु, तो ज्या ठिकाणी बुडाला त्या ठिकाणी नदीपात्र खोल असल्याने तो दिसेनासा झाला. सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत तब्बल आठ तासांमध्ये रवींद्रचा पोलीस अग्निशमन दलाचे जवान व प्रशिक्षित जीव रक्षकांकडून शोध घेतला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. या घटनेनंतर प्रशिक्षणार्थी रवींद्रने लाईफ जॅकेट घातले होते का नाही ,त्यास उपलब्ध करून दिले होते का नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच सायखेङा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -