घरताज्या घडामोडीलॉकडाऊनचा फटका : घरी जाता येत नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

लॉकडाऊनचा फटका : घरी जाता येत नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Subscribe

नाशिक येथील एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे लॉकडाऊनमध्ये जेवणाचे हाल होत होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने नाशिक शहरात राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. रुपेश भरत पाटील (२२) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रावेर येथील पाल रोडवर श्रीराम पाटील यांच्या फॅक्ट्रीमध्ये वास्तव्यास असलेल्या भरत पाटील यांची दोन्ही मुले उच्च शिक्षणासाठी नाशिक शहरातील पुष्पराज अॅनेक्स, पाईपलाईन रोड, नाईस वजन काट्याजवळ गुलमोहर कॉलनी सातपूर येथे राहत होते. दोघाही मुलांची नावे मयूर व रुपेश पाटील असे असून ते शहरातीलच एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. कोरोना व्हायरसच्या शिरकावानंतर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे त्याचे जेवणाचे हाल होत असल्याचे त्याच्या नातेवाईकांना समजले. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी १४ एप्रिल रोजी जळगाव पोलिसांना मुलांना घ्यायला जाऊ देण्याबाबत परवानगीचा अर्ज करण्यात आला होता. मात्र, जळगाव पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा विद्यार्थी तणावात होता. कुटुंबातही यामुळे अस्वस्थता होती. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्याने घरातील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर रुपेशच्या भावाने याबाबतची माहिती सातपूर पोलिसांना दिली. घटनास्थळी सातपूर पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी रुपेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा मृत्यू लॉकडाऊनमुळेच झाला आहे, असा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला. मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला आहे. त्याने केलेली आत्महत्या वैयक्तिक कारणाने केली असून ती लॉकडाऊन व जेवणाचे हाल होत असल्यामुळे किंवा गावी जाण्याची परवानगी न मिळाल्यामुळे केलेले आहे, असा कोणताही प्रकार नाही. त्याचे मृत्यूचे निश्चित कारण शोध घेत आहोत. सदर घटनेबाबतच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे सातपुरचे पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -