घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा परिषदेचे विद्यार्थी करणार स्वच्छतेसाठी प्रबोधन

जिल्हा परिषदेचे विद्यार्थी करणार स्वच्छतेसाठी प्रबोधन

Subscribe

नाशिक : स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत 20 ऑक्टोबर अर्थात महात्मा गांधी जयंतीपासून लेट्स चेंज क्लीन मॉनिटर मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील पाचवी ते आठवी इयत्तेतील एक विद्यार्थी आपल्या गावात क्लीन मॉनिटर अर्थात स्वच्छता प्रतीनिधि म्हणून काम करणार आहे. याच मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये १० नोव्हेंबर पर्यंत कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

प्रशासनाने कितीही प्रयत्न केला, नवनवीन योजना राबवल्या तरी जोपर्यंत नागरिक स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेच्या बाबत सजग होत नाहीत तोपर्यंत स्वच्छतेचे उद्दीष्ट प्राप्त करणे अवघड आहे. त्याचमुळे नागरिकांना प्रत्साहित करण्याच्या अनुषंगाने शिक्षणमंत्र्यांच्या कल्पनेतून लेट्स चेंज क्लीन मॉनिटर ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत नियुक्त केलेल्या मॉनिटरने आपल्या गावात जिथे नागरिक अस्वच्छता करत आहेत, कचरा करत आहेत, उघड्यावर सौचास बसत आहेत, कचर्‍याची योग्यरित्या विल्हेवाट लावत नाहीत अश्या सर्व ठिकाणी नागरिकांना अटकाव करून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून सांगायचे आहे. त्याच सोबत त्यांना आपला परिसर, घर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. जो मॉनिटर चांगली कामगिरी करेल त्याला जिल्हास्तरीय प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शाळा या प्रकल्पाबाबत सक्रिय झालेल्या असून जिल्हास्तरावरून तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फतही या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत शाळांना सूचित करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे आपले विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर बनून कळत नकळत होणार्‍या कचर्‍याच्या बाबतीतल्या निष्काळजीपणाची असामाजिक सवय आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शाळेतून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरिंग करण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे : डॉ. मच्छिंद्र कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -