घरताज्या घडामोडीविद्यार्थ्यांनी वास्तव्याचे ठिकाण सोडू नये!

विद्यार्थ्यांनी वास्तव्याचे ठिकाण सोडू नये!

Subscribe

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सूचना; परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलाचे संकेत

नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या अंतीम वर्ष अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि.16 जुलैपासून घेण्यात येणार आहे. विद्यापीठाने याविषयी तात्पुरत्या स्वरुपात वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थी सद्यस्थितीस वास्तव्यास असलेल्या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी वास्तव्याचे ठिकाणे सोडू नये, असे आदेश आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिले आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ वार्षिक परीक्षांचे अंतिम वेळापत्रक लवकरच संकेतस्थळावर जाहीर करणार आहेत. याविषयी परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, कोव्हीड-19 आजाराचा प्रादुर्भाव व टाळेबंदीच्या सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने परीक्षार्थींनी सध्याचे वास्तव्याचे ठिकाण सोडू नये.तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. परीक्षा सदंर्भात परीक्षासंदर्भात आवश्यक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणार्‍या सूचना व बातम्यांवर विश्वास ठेवू नये. विद्यापीठ परीक्षा संबंधी अधिक माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यांगत यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ देण्यात येणार असल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -