घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महानगरपालिका : विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व

नाशिक महानगरपालिका : विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व

Subscribe

मनसेचा भोपळाही फुटला नाही

महापालिकेत विषय समित्यांच्या नियुक्त्या मंगळवारी (ता. ९) महासभेत करण्यात आल्यात. महापालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने प्रत्येक समितीतील नऊ पैकी पाच सदस्यांवर भाजपचे वर्चस्व राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांना प्रत्येक समितीत एका जागेवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विषय समित्यांमध्ये खातेही उघडता आले नाही.

विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच विभागातील नगरसेवकांना विशेषत: नाराजांची समित्यांवर वर्णी लावून खुश करण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला स्थायी समिती वगळता अन्य कोणत्याही समितीत स्थान मिळालेले नाही.

- Advertisement -

नियुक्त केलेले सदस्य पुढील प्रमाणे-

महिला व बाल कल्याण समिती भाजपच्या पूनम सोनवणे, मीरा हांडगे, प्रियांका घाटे, इंदुमती नागरे, हेमलता कांडेकर शिवसेनेच्या सीमा निगळ, रंजना बोराडे, हर्षा बडगुजर आणि राष्ट्रवादीच्या समीना मेमन.
शहर सुधार समिती- भाजपच्या शांताताई हिरे, डॉ. सीमा ताजणे, सुरेश खेताडे, छाया देवांग, अनिल ताजनपुरे, शिवसेनेचे भागवत आरोटे, सुदाम डेमसे, डी. जी. सूर्यवंशी आणि काँग्रेसचे राहुल दिवे.

आरोग्य वैद्यकिय सुधार समिती– भाजपचे पूनम धनगर, अंबादास पगारे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, अर्चना थोरात, शिवसेनेचे रमेश धोंडगे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले आणि काँग्रेसच्या आशा तडवी.
विधी समिती- भाजपचे अनिता सातभाई, रूची कुंभारकर, नीलेश ठाकरे, रविंद्र धिवरे, राकेश दोंदे, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे, चंद्रकांत खाडे, डी जी सूर्यवंशी, राष्ट्रवादीच्या शोभा साळवे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -